आत्मनिर्भर भारत | थीम 2.0 | आजादी का अमृत महोत्सव, भारत सरकार।

आत्मनिर्भर भारत

Atmanirbhar Bharat

आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारत अभियान किंवा स्वयंपूर्ण भारत  ही नव्या भारताबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन सांगणारी मोहिम आहे. १२ मे २०२० रोजी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून आत्मनिर्भरतेची हाक दिली. यासाठी विशेष आर्थिक आणि सर्वंकष स्वरूपाचे पॅकेज दिले गेले. २० लाख कोटींची तरतूद यासाठी केली गेली आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के इतकी ही तरतूद आहे. कोविड महामारीचा मुकाबला करण्यासाठी देश सज्ज करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल होते. 

देशाला आणि नागरिकांना सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने याची आखणी करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पाच आधारस्तंभावर उभारली असल्याचे मा. पंतप्रधानांनी नमुद केले आहे. - अर्थकारण, पायाभूत सुविधा, प्रणाली, लोकांमधील उत्साह-इच्छाशक्तीस चालना आणि मागणी.

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत ७ क्षेत्रांना सक्षम करणे , त्यात सुधारणा घडवणे यावर अर्थमंत्र्यांनी भर दिला आहे. कृषीसाठी पुरवठा प्रणालीत सुधारणा, तर्कसंगत कर प्रणाली, साधे व स्पष्ट कायदे, सक्षम मनुष्यबळ, आर्थिक प्रणालीला बळकट करणे व आत्मनिर्भरतेच्या ध्येयाच्या दिशेने विकसित करणे. 

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढील क्षेत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण असेल

  • अर्थकारण: आर्थिक सक्षमीकरणात टप्प्याटप्प्याने बदलांपेक्षाही अमुलाग्र व मोठे बदल घडवणे. त्या दिशेने झेपावणे.
  • पायाभूत सुविधा: आधुनिक भारतासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती
  • प्रणाली किंवा व्यवस्थात्मक प्रयत्न: आत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध व्यवस्थात्मक रचना.
  • लोकसंख्येला बलस्थान मानून विकास: भारत सर्वात मोठा लोकशाही देश आहे. या लोकसंख्येला सक्रिय व दिशादर्शन करून विकासाच्या दिशेने कृतीशील करणे.
  • मागणी: मागणी आणि पुरवठा शक्तीचा कमाल वापर

 आत्मनिर्भर भारत कसा असावा ?

  • पायाभूत सुविधा: भारताच्या पायाभूत उभारणीतील महत्त्वाच्या विकास कामांचा प्रचार करणे व त्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना अधोरेखित करून आत्मनिर्भरतेच्या प्रक्रियेतील त्यांचे महत्त्व सांगणे. 
  • डिजिटल पोहोच वाढवणे: आत्मनिर्भर प्रक्रियेला वेग आणण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर वाढवणे, पेमेंट अॅप, अन्न ऑनलाईन मागवणे, किराणाची ऑनलाइन खरेदी, टेलि मेडिसिन, टेलि लॉ .- डिजिटल साधनांचा वापर करून स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने प्रयत्नशील असणे.
  • युवा, उद्योजक, स्टार्टअप्स: उद्योजकता प्रवृत्ती वाढीसाठी मानसिकता तयार करणे. सामुदायिक प्रशिक्षण व नेतृत्व गुण विकासाच्या संधी देणे, निकोप स्पर्धांसाठी मंच उपलब्ध करून देणे , नव्या स्पर्धात्मक दालनांची उपलब्धता वाढवणे. भारतातील अभिनव स्टार्टअप्स जगाच्या विकासात देखील आपले योगदान देत आहेत. 
  • क्षेत्रवार सुधारणा आणि आत्मनिर्भरता : विविध क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी त्यानुरूप सुधारणा घडवणे. प्रत्येक क्षेत्रातील गरज व सुधारणांचा परिणाम याचे विश्लेषण वेळोवेळी करणे. सुधारणा व बदलांसाठी उपक्रम राबविणे, व्यापाराभिमुख धोरणांची आखणी करणे.
  • मनुष्यबळ विकास: कौशल्य विकास, प्रशिक्षण, करिअरचे नवे पर्याय उपलब्ध करून देणे. विविध पर्यायांबद्दल माहिती प्रसारीत करणे. 
  • सक्षम अर्थ प्रणाली: मुलांना सोप्या व खेळांच्या माध्यमातून वित्तीय प्रणालीचे ज्ञान देणे.  पैशाचा विनियोग व त्याच्या पद्धतींविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, ग्रामीण लक्ष्य गटांमध्ये याबद्दल जागरूकता, तंत्रज्ञान व सायबर सुरक्षेसंबंधी शिबिर आयोजित करून माहिती देणे.
  • व्होकल फॉर लोकल: आयातीवर मर्यादा आणणे, निर्यातीस प्रोत्साहन, स्थानिक उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी अभियान राबविणे, ग्रामीण प्रकल्पांच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेविषयी जागरूकता वाढवणे. 
  • सामुहिक प्रयत्नांवर भर: विविध क्षेत्र, उद्योग, संस्था यांच्यादरम्यान संवाद सेतू निर्माण करून परस्परांच्या सहकाऱ्याने  व परस्परांच्या बलस्थानांचा वापर करून उत्पादकता वाढ तसेच स्त्रोतांचा कमाल वापर करून घेण्यास प्रेरित करणे. त्याद्वारे अधिकाधिक उत्पादकता वाढवणे.
  • भारत- जागतिक उत्पादनाचे केंद्र: यासाठी विविध अभियान राबविणे, आपल्या यशकथा अधोरेखित करणे. या माध्यमातून नव्या संधी खेचून आणणे (उदा. आयफोन्सची भारतात निर्मिती) 
  • भारत- सहकार्यासाठी तत्पर देश: वसुधैव कुटुम्बकम् या भारतीय मुल्याचा जगभरात प्रसार करणे. भारत जगालाच कुटुंब मानतो या तत्त्वाच्या प्रसारासाठी उपक्रम राबविणे. जगातील विविध देशांना सहकार्य करण्यास भारत तत्पर असल्याचा संदेश संप्रेषित करणे. मैत्रीपूर्ण परराष्ट्र धोरणाला प्राधान्य देणे.
read more

Top