भारत सरकारGOVERNMENT OF INDIA
संस्कृति मंत्रालयMINISTRY OF CULTURE
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, अनेक कवी आणि लेखकांनी क्रांतिकारी साहित्य निर्मिले. त्यापैकी काही साहित्यावर इंग्रज सरकारने बंदी घातली होती, कारण हे लेखन भारतातील त्यांच्या शासनाच्या 'सुरक्षेसाठी' 'धोकादायक' मानले गेले होते. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि त्यांना स्वतंत्र भारतासाठी जागवण्याचे आवाहन करणे हा या साहित्याचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना, आकांक्षा आणि संकल्प यांचे प्रतिनिधित्व करणारे हे अनोखे साहित्य बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
ह्या विभागात प्रमुख व्यक्तींनी वाचून दाखवलेल्या अशा बंदी लादली गेलेल्या साहित्यातील प्रातिनिधिक भाग आहे