थीम 2.0 | आझादी का अमृत महोत्सव | सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार.

थीम 2.0

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देश आहे. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत जन चळवळीतून सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाची उद्दिष्टे निश्चित केली आहेत. विकासाच्या प्रक्रियेत काही अंशी पिछाडीवर असलेल्या क्षेत्रांचा यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी नवी संकल्पना माननीय पंतप्रधानांनी मांडली आहे. याला पंच-प्रण असे नाव देण्यात आले आहे. प्रण म्हणजे निर्धार. यात महिला-मुले, आदिवासी सबलीकरण, पाणी, सांस्कृतिक अस्मिता संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली, आरोग्य-निरामयता, सर्वसमावेशक विकास, आत्मनिर्भर भारत आणि एकात्मता या दिशेने नियोजित वाटचाल करणे अपेक्षित आहे. 

थीम 2.0
महिला आणि मुले

महिला आणि मुले 

बालविकासात गुंतवणूक म्हणजे देशाच्या उज्वल भविष्यासाठीची ती मूलभूत निकड आहे. मूल्य, शिक्षण, बालकांचे आरोग्य हे कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासाचा पहिला निकष आहे. त्यावरून जगात देशाची प्रतिमा निश्चित होते. मुलांना नागरी, सामाजिक, मूल्य शिक्षणापर्यंत पोहोच मिळणे गरजेचे आहे. आरोग्य सुविधा,विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक क्षेज्ञातील विकासात बालकांचा समावेश अनिवार्य आहे. देशात बालसंगोपनात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. मात्र आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण या क्षेत्रांत ग्रामीण आणि दुर्गम भागात सुधारणांना भरपूर वाव आहे. 

अधिक जानें
आदिवासी सबलीकरण

आदिवासी सबलीकरण 

देशभरात आपला समृद्ध वारसा आणि संस्कृती जतनाच्या कामात आदिवासी समुदायांचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्य चळवळीत या समुदायांचे योगदान काय होते, या संबंधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानात अनेक उपक्रमांतर्गत माहिती प्रसारीत केली जात आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहचवली जात आहे. 

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची संख्या १० कोटी ४ लाख आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ८.६ % लोक आदिवासी आहेत. भारताच्या विकास प्रक्रियेत यांचे योगदान लक्षणीय आहे. स्वातंत्र्य चळवळीत, क्रिडा क्षेत्रात आणि व्यवसाय-व्यापारातही या समुदायाने ठसा उमटवला आहे.  

अधिक जानें
पाणी

पाणी

पाणी म्हणजे जीवन. जीवनाची पूर्वअटच म्हणावे लागेल. पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता मर्यादीत आहे. पाणी वितरणात असमानता असल्याने अनेक लोक त्यामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या जीवनावर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. 

जलसंधारण आणि स्त्रोतांचे  पुनरूज्जीवन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार विविध अभिनव अभियान राबवत आहे. यात हर खेत पानी (प्रत्येक शेतात पाणी) , नदी उत्सव, अमृत सरोवर या अभियानांचा समावेश आहे. 

अधिक जानें
पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE)

पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE)

संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद अर्थात UNFCCC COP26 मधे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट( LiFE) अभियानाची घोषणा केली. हवामान बदलांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे हे या अभियानाचे ध्येय आहे. 

स्त्रोतांचा मर्यादीत व गरजेपुरताच वापर करण्याची मानसिकता विकसित करणे. पर्यावरण चक्राला बाधा होऊ नये अशाप्रकारे जीवनशैलीत बदल घडवून आणने. वापरा व फेकून द्या या प्रवृत्तीमुळे होणारी अतिरिक्त नासधूस थांबवण्यासाठी या उपक्रमात प्रयत्न करण्यात येत आहेत.  प्रत्येकाने दैनंदिन सवयीत छोटे बदल केल्यास हवामान बदलांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणे शक्य आहे या विश्वासातून हे उपक्रम हाती घेतले आहेत. 

अधिक जानें
आरोग्य आणि निरामयता

आरोग्य आणि निरामयता

आरोग्याच्या क्षेत्रात रुग्णालय, वैद्यकीय साहित्य-उपकरणे, क्लिनिकल चाचण्या,आऊटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य वीमा यांचा समावेश होतो.  प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धती हे दोन घटक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 

भारताच्या संदर्भात विचार केल्यास आयुर्वेद, योग, निसर्गोपचार याचे पारंपारिक ज्ञान आपल्या जीवनशैलीचा भाग राहिले आहे. पूर्वीपासून याचा वापर होत आहे. युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांचे भारतातील आरोग्य यंत्रणेत अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. दैनंदिन जीवनातही याच्याशी संबंधित सवयी आहेत. 

अधिक जानें
सर्वसमावेशक विकास

सर्वसमावेशक विकास

सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेत प्रत्येकासाठी संधी हे प्रमुख लक्ष्य असून प्रत्येक  सामाजिक आणि आर्थिक स्तरातील व्यक्तीला सामावून घेणे अपेक्षित आहे. समाजातील प्रत्येक घटकास संधीची समानता असली पाहिजे. 

पाणी, स्वच्छता, घरकुल, वीज या मूलभूत गरजांचा पुरवठा अनिवार्य आहे. वंचित घटकांना विकास प्रक्रियेत लाभ देणे काळाची गरज असून विकसित भारतासाठी ती पूर्वअट आहे. 

अधिक जानें
आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारत अभियान किंवा स्वयंपूर्ण भारत  ही नव्या भारताबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन सांगणारी मोहिम आहे. १२ मे २०२० रोजी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून आत्मनिर्भरतेची हाक दिली. यासाठी विशेष आर्थिक आणि सर्वंकष स्वरूपाचे पॅकेज दिले गेले. २० लाख कोटींची तरतूद यासाठी केली गेली आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के इतकी ही तरतूद आहे. कोविड महामारीचा मुकाबला करण्यासाठी देश सज्ज करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल होते. 

देशाला आणि नागरिकांना सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने याची आखणी करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पाच आधारस्तंभावर उभारली असल्याचे मा. पंतप्रधानांनी नमुद केले आहे. - अर्थकारण, पायाभूत सुविधा, प्रणाली, लोकांमधील उत्साह-इच्छाशक्तीस चालना आणि मागणी.

अधिक जानें
सांस्कृतिक अस्मिता संवर्धन

सांस्कृतिक अस्मिता संवर्धन

भारत हा बहुसांस्कृतिक वैविध्याने समृद्ध देश आहे. भारतीय सभ्यता जगातील प्राचीन सभ्यतांपैकी एक आहे. ४०००[1] वर्षांच्या आपल्या सांस्कृतिक इतिहासात अनेक अभिमानास्पद विचार प्रवाह निर्माण झाले. चालीरीती, परंपरांची एक वैभवशाली शृंखला या देशाने पाहिली आहे. यातून भारत सांस्कृतिकदृष्ट्या आकाराला आला. एका समृद्ध वारशाचा ठेवा आपल्याकडे आहे. 

 या वैभवशाली वारशामध्ये काही अभिजात आणि स्वादीष्ट पक्वान्न देखील आहेत. पाककलेचे इतके रंग आणि ढंग भारतात आहेत की एक आयुष्य ते शिकण्यासाठी पुरे पडणार नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना या सगळ्या कलांचा सार्थ अभिमान आहे. एक पिढी हा वारसा दुसऱ्या पिढीकडे सूपूर्द करते. 

अधिक जानें
एकात्मता

एकात्मता

सांस्कृतिक वैविध्याने नटलेला देश ही भारताची ओळख आहे. उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत आणि पूर्व ते पश्चिम या भूमिवर शेकडो संस्कृती वसतात. विविध परंपरा, भाषा, खानपान, पेहराव, उत्सव आणि अनेक प्रकारचे वैविध्य इथे आहे.विविधतेत एकता निर्माण करून विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणे ही आत्मनिर्भर भारत या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीकोनाची मूल भावना आहे. त्यामुळे पंच प्रण या ध्येयधोरणा अंतर्गत ‘एकात्मता’ तत्वाचा समावेश केला आहे. ७६ व्या स्वातंत्र्य दिनी भूमिका मांडताना पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला होता. समान उद्देश घेऊन आपण एकत्रित मार्गक्रमण करावे आणि स्वातंत्र्याची शंभरी एकात्मतेतून उज्ज्वल होईल याबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला होता. 

अधिक जानें

Top