थीम | आझादी का अमृत महोत्सव | सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार.

थीम

स्वातंत्र्यलढा

इतिहासातील मैलाचे दगड, विस्मृतीत गेलेल्या नायकांचे स्मरण.

ही थीम आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्मरणप्रधान उपक्रमांना सुनिश्चित करते. ज्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य आपल्यासाठी सत्यात उतरले आणि 15 ऑगस्ट, 1947 च्या ऐतिहासिक प्रवासातील टप्पे, स्वातंत्र्य चळवळी इत्यादींचे पुनरावलोकन , तसेच होते अशा विस्मृतीत गेलेल्या वीरांच्या कथा जिवंत करण्यात मदत करते.

अधिक जाणून घ्या

आयडियाझ्@75

भारताला आकार देणाऱ्या कल्पना आणि आदर्शांचा उत्सव साजरा करणे

ही थीम अशा कल्पना आणि आदर्शांनी प्रेरित असणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते ज्यांनी आपल्याला एक आकार दिला आहे आणि आपण अमृत काल (भारत@75 आणि भारत@100 मधील 25 वर्षे) या काळात प्रवास करीत असताना आपल्याला मार्गदर्शन करेल. जग बदलते आहे आणि एक नवीन जग उमलत आहे. आपल्या विश्वासाची शक्ती आपल्या कल्पनांचे दीर्घायुष्य निश्चित करेल.

अधिक जाणून घ्या

रिझॉल्व्ह@75

विशिष्ट उद्दिष्टे आणि लक्ष्यांसाठी वचनबद्धता सशक्त करणे

ही थीम आपल्या मातृभूमीचे विधिलिखित, आपल्या सामूहिक संकल्पावर आणि दृढनिश्चयावर लक्ष केंद्रित करते. 2047 च्या प्रवासासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने पुढे येऊन व्यक्ती, गट, नागरी समाज, प्रशासन संस्था इत्यादी नात्यांनी आपली भूमिका वठवली पाहिजे.

अधिक जाणून घ्या

कृती@75

धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि वचनबद्धता प्रत्यक्षात आणण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रकाश टाकणे.

ही थीम धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि वचनबद्धता प्रत्यक्षात आणण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रकाश टाकून कोविड नंतरच्या जगात उदयास येत असलेल्या नवीन जागतिक व्यवस्थेमध्ये भारताला त्याचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते.

अधिक जाणून घ्या

अचिव्हमेंट्स@75

विविध क्षेत्रातील उत्क्रांती आणि प्रगती दर्शविणे

ही थीम काळातील आपल्या वाटचालीतील सर्व टप्पे चिन्हांकित करण्यावर लक्ष केंद्रित करते. 5000+ वर्षांच्या प्राचीन इतिहासाचा वारसा असलेला 75 वर्षे जुना स्वतंत्र देश म्हणून आपल्या सामूहिक कामगिरीची जनमानसात नोंद करणे हा ह्या थीमचा हेतू आहे.

अधिक जाणून घ्या

Top