आमच्याबद्दल | आझादी का अमृत महोत्सव | सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार.

आमच्याबद्दल

आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारचा स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि भारतीय लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठीचा उपक्रम आहे.

हा महोत्सव भारतातील त्या लोकांना समर्पित आहे ज्यांनी भारताला आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात इथपर्यंत आणण्यात महत्त्वाची भूमिकाच केवळ बजावली नाही, तर ज्यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनेने प्रेरित झालेल्या भारत 2.0 च्या सक्रिय दृष्टीकोनाला सक्षम करण्याची शक्ती आणि योग्यताही आहे.

आझादी का अमृत महोत्सव चा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला आणि त्याबरोबरच आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनासाठी 75 आठवड्यांचे काउंटडाउन सुरू झाले. त्याला 15 ऑगस्ट 2023 रोजी एक वर्ष पूर्ण होईल. आझादी का अमृत महोत्सव च्या पाच थीम खालीलप्रमाणे आहेत.

उद्घाटनाचा कार्यक्रम

नरेंद्र मोदी, भारत के प्रधान मंत्री

आझादी अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याच्या ऊर्जेचे अमृत; स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांच्या प्रेरणेचे अमृत; नवीन कल्पना आणि प्रतिज्ञांचे अमृत; आणि आत्मनिर्भरतेचे अमृत. म्हणूनच हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या प्रबोधनाचा उत्सव आहे; सुशासनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा सण; आणि जागतिक शांतता आणि विकासाचा उत्सव.

नरेंद्र मोदी, भारत के प्रधान मंत्री

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान

उद्घाटनाचा कार्यक्रम

आझादी का अमृत महोत्सव: भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी

आझादी का अमृत महोत्सव ही भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची मालिका आहे. जन-भागीदारीच्या भावनेतून हा महोत्सव जन-उत्सव म्हणून साजरा केला जात आहे.

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंतचे लक्ष्य निश्चित करून या पंच-प्रण (पाच निर्धार) संकल्पनेच्या दिशेने जन चळवळीला बळकटी देण्याचा उद्देश आहे. संपूर्ण देशात आणि जगात लोक सहभागातून अभियान राबवणे यात अपेक्षित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात समावेश करून घेण्यासाठी ९ क्षेत्रांत काम करणे पंच-प्रण अंतर्गत अपेक्षित आहे. महिला-मुले, आदिवासी सबलीकरण, पाणी, सांस्कृतिक अस्मिता संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली, आरोग्य-निरामयता, सर्वसमावेशक विकास, आत्मनिर्भर भारत आणि एकात्मता ही उदीष्ट्ये माननीय पंतप्रधानांनी सांगितली आहेत. 

Top