Azadi Ka Amrit Mahotsav

100304649

अभ्यागत

516885

स्पर्धांमध्ये सहभाग

188994

प्रकाशित कार्यक्रम

आझादी का अमृत महोत्सव

आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारचा स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि भारतीय लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठीचा उपक्रम आहे.

अधिक वाचा

हा महोत्सव भारतातील त्या लोकांना समर्पित आहे ज्यांनी भारताला आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात इथपर्यंत आणण्यात महत्त्वाची भूमिकाच केवळ बजावली नाही, तर ज्यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनेने प्रेरित झालेल्या भारत 2.0 च्या सक्रिय दृष्टीकोनाला सक्षम करण्याची शक्ती आणि योग्यताही आहे.

आझादी का अमृत महोत्सव चा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला आणि त्याबरोबरच आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनासाठी 75 आठवड्यांचे काउंटडाउन सुरू झाले. त्याला 15 ऑगस्ट 2023 रोजी एक वर्ष पूर्ण होईल. आझादी का अमृत महोत्सव च्या पाच थीम खालीलप्रमाणे आहेत.

आझादी का अमृत महोत्सव

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंतचे लक्ष्य निश्चित करून या पंच-प्रण (पाच निर्धार) संकल्पनेच्या दिशेने जन चळवळीला बळकटी देण्याचा उद्देश आहे. संपूर्ण देशात आणि जगात लोक सहभागातून अभियान राबवणे यात अपेक्षित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात समावेश करून घेण्यासाठी ९ क्षेत्रांत काम करणे पंच-प्रण अंतर्गत अपेक्षित आहे. महिला-मुले, आदिवासी सबलीकरण, पाणी, सांस्कृतिक अस्मिता संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली, आरोग्य-निरामयता, सर्वसमावेशक विकास, आत्मनिर्भर भारत आणि एकात्मता ही उदीष्ट्ये माननीय पंतप्रधानांनी सांगितली आहेत. 

नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाप्रमाणेच, स्वातंत्र्यानंतरचा 75 वर्षांचा प्रवास हा सामान्य भारतीयांच्या मेहनतीचे, नवनिर्मितीचे, उपक्रमाचे प्रतिबिंब आहे. देशात असो किंवा परदेशात, आपण भारतीयांनी आपल्या मेहनतीने स्वतःला सिद्ध केले आहे. आपल्याल्या आपल्या संविधानाचा अभिमान आहे. आपल्याल्या आपल्या लोकशाही परंपरांचा अभिमान आहे. लोकशाहीची जननी असलेला भारत आजही लोकशाही बळकट करून पुढे जात आहे. ज्ञान आणि विज्ञानाने समृद्ध असलेला भारत मंगळापासून चंद्रापर्यंत आपली मुद्रा उमटवीत आहे.

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान

नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

आझादी अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याच्या ऊर्जेचे अमृत; स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांच्या प्रेरणेचे अमृत; नवीन कल्पना आणि प्रतिज्ञांचे अमृत; आणि आत्मनिर्भरतेचे अमृत. म्हणूनच हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या प्रबोधनाचा उत्सव आहे; सुशासनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा सण; आणि जागतिक शांतता आणि विकासाचा उत्सव.

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान

होत असलेले विशेष कार्यक्रम

Indian Art, Architecture, and Design Biennale 2023

Indian Art, Architecture, and Design Biennale 2023

Start Date December 8, 2023

End Date March 31, 2024

Organiser -Ministry of Culture

Ideas@75

Meri Maati Mera Desh

Meri Maati Mera Desh

Start Date August 9, 2023

End Date October 31, 2023

Organiser -Ministry of Youth Affairs and Sports and Ministry of Culture

Freedom Struggle

आगामी विशेष कार्यक्रम

आझादी का अमृत महोत्सवाच्या पाच थिम्स

स्वातंत्र्यलढा

ही थीम आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्मरणप्रधान उपक्रमांना सुनिश्चित करते. ज्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य आपल्यासाठी सत्यात उतरले आणि 15 ऑगस्ट, 1947 च्या ऐतिहासिक प्रवासातील टप्पे, स्वातंत्र्य चळवळी इत्यादींचे पुनरावलोकन होते अशा विस्मृतीत गेलेल्या वीरांच्या कथा जिवंत करण्यात मदत करते.

या थीम अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये बिरसा मुंडा जयंती (जनजातीय गौरव दिवस), नेताजींची प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट ऑफ फ्री इंडिया घोषणा, शहीद दिवस इत्यादींचा समावेश आहे.

या थीम अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाच्या विशेष उपक्रमांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे

पुढे वाचा

आयडियाझ्@75

ही थीम अशा कल्पना आणि आदर्शांनी प्रेरित असणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते ज्यांनी आपल्याला एक आकार दिला आहे आणि आपण अमृत काल (भारत@75 आणि भारत@100 मधील 25 वर्षे) या काळात प्रवास करीत असताना आपल्याला मार्गदर्शन करेल. जग बदलते आहे आणि एक नवीन जग उमलत आहे. आपल्या विश्वासाची शक्ती आपल्या कल्पनांचे दीर्घायुष्य निश्चित करेल. या थीम अंतर्गत असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय, सहभागी उपक्रमांचा समावेश आहे जे जगामध्ये भारताचे अद्वितीय योगदान अधोरेखित करण्यात मदत करतात. यामध्ये काशीच्या भूमीतील दिग्गज हिंदी साहित्यिकांना समर्पित काशी उत्सव, पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेली पोस्ट कार्ड्स - ७५ लाखांहून जास्त मुलांनी २०४७ मधील भारतासंबंधी त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करणारी आणि आता विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यवीरांबद्दलची त्यांच्या मनातील चित्रे रेखाटणारी पत्रे - यांसारख्या कार्यक्रमांचा आणि उपक्रमांचा समावेश आहे...

पुढे वाचा

रिझॉल्व्ह@75

ही थीम आपल्या मातृभूमीचे विधिलिखित, आपल्या सामूहिक संकल्पावर आणि दृढनिश्चयावर लक्ष केंद्रित करते. 2047 च्या प्रवासासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने पुढे येऊन व्यक्ती, गट, नागरी समाज, प्रशासन संस्था इत्यादी नात्यांनी आपली भूमिका वठवली पाहिजे. आपल्या सामूहिक संकल्पाने, उत्कृष्ट आखलेल्या कृती-योजनांमुळे आणि दृढनिश्चयी प्रयत्नांमुळेच केवळ कल्पनांचे कृतीत रूपांतर होईल. ह्या थीम अंतर्गत असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 'संविधान दिवस', 'सुशासन सप्ताह' आदी उपक्रमांचा समावेश आहे, ज्यांमुळे ध्येय्याने प्रेरित असताना 'People and Planet' साठीची आपली वचनबद्धता जिवंत करण्यात मदत होईल.

पुढे वाचा

कृती@75

ही थीम धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि वचनबद्धता प्रत्यक्षात आणण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रकाश टाकून कोविड नंतरच्या जगात उदयास येत असलेल्या नवीन जागतिक व्यवस्थेमध्ये भारताला त्याचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते. हे पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास'च्या ' आवाहनामुळे चालते, यामध्ये सरकारी धोरणे, योजना, कृती योजना आणि व्यवसाय, स्वयंसेवी संस्था, नागरी समाज यांच्या वचनबद्धतेचा समावेश आहे जे आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करतात आणि आपल्याला एकत्रितपणे चांगले भविष्य निर्माण करण्यात मदत करतात. या थीम अंतर्गत कार्यक्रमांमध्ये गती शक्ती - नॅशनल मास्टर प्लॅन फॉर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी सारख्या उपक्रमांचा समावेश आहे....

पुढे वाचा

अचिव्हमेंट्स@75

ही थीम काळातील आपल्या वाटचालीतील सर्व टप्पे चिन्हांकित करण्यावर लक्ष केंद्रित करते. 5000+ वर्षांच्या प्राचीन इतिहासाचा वारसा असलेला 75 वर्षे जुना स्वतंत्र देश म्हणून आपल्या सामूहिक कामगिरीची जनमानसात नोंद करणे हा ह्या थीमचा हेतू आहे.

या थीम अंतर्गत कार्यक्रमांमध्ये 1971 च्या विजयाला समर्पित स्वर्णिम विजय वर्ष, महापरिनिर्वाणदिवसाच्या निमित्ताने श्रेष्ठ योजना सुरू करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे..

पुढे वाचा

व्हिडिओज दालन

सोशल फीड्स

Top