सांस्कृतिक चेतना जागर
भारत हा बहुसांस्कृतिक वैविध्याने समृद्ध देश आहे. भारतीय सभ्यता जगातील प्राचीन सभ्यतांपैकी एक आहे. ४००० वर्षांच्या आपल्या सांस्कृतिक इतिहासात अनेक अभिमानास्पद विचार प्रवाह निर्माण झाले. चालीरीती, परंपरांची एक वैभवशाली शृंखला या देशाने पाहिली आहे. यातून भारत सांस्कृतिकदृष्ट्या आकाराला आला. एका समृद्ध वारशाचा ठेवा आपल्याकडे आहे.
या वैभवशाली वारशामध्ये काही अभिजात आणि स्वादीष्ट पक्वान्न देखील आहेत. पाककलेचे इतके रंग आणि ढंग भारतात आहेत की एक आयुष्य ते शिकण्यासाठी पुरे पडणार नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना या सगळ्या कलांचा सार्थ अभिमान आहे. एक पिढी हा वारसा दुसऱ्या पिढीकडे सूपूर्द करते.
हिंदी भाषेत यासाठी एक समर्पक म्हण आहे, ‘ कोस कोस पर बदले पानी, चार कोस पर बाणी’ . मराठी भाषेतही म्हटले जाते की दर बारा कोसावर भाषा बदलते. बहुजातीय, वंशीय, धर्मीय असा हा देश आहे. भाषिक अस्मितांनी जोडला गेलेला हा देश एका वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा वाहक आहे. विविध राज्यात भटकंती केली तर येथिल वारसास्थळे व भव्य वास्तूकला थक्क करतात. लोकांनी या संस्कृतीचे अभिमानाने जतन केले आहे.पारंपारिक अन्न पदार्थ, बोलीभाषा व पेहराव यांचाही वारसा पुढे नेला जात आहे.
- भारतीय साहित्याचा प्रसार ( स्थानिक- प्रादेशिक स्तरावर पुढाकार): रादेशिक प्रकाशन संस्थांच्या मदतीने, भारतीय भाषांचे मूळ(उगम) व त्याविषयी जागरूकता आणणे, भारतीय भाषांचा इतर देशांतील भाषांवरील प्रभाव याबद्दल माहिती देणे, ऐतिहासिक ग्रंथालयांविषयी सजगता निर्माण करणे
- कलाप्रकार, लोकसंस्कृती, संगीत, नृत्य: माणसाकडे असलेला अमुर्त सांस्कृतिक वारसा[2] म्हणजेच गाणी, नृत्य, नाट्य, संगीत, लोक परंपरा, चित्र, लेखन यांचा अमुल्य व अथांग ठेवा भारताकडे आहे.
- राष्ट्रीय ओळख: दीर्घ ऐतिहासिक बदलांच्या टप्प्यांतून देश गेला आहे. "भारताची वेगळी ओळख" या विविध बदलांच्या ओघात बदलणे स्वाभाविक होते. राजकीय, धार्मिक संस्थामध्ये देखील अंतर्बाह्य परिवर्तन दिसून येते. देश विकास करत आहे. नवी पिढी देखील वैभवशाली संस्कृती जतन करण्यासाठी मोलाचा वाटा उचलत आहे.
- प्रादेशिक भाषांचे जतन आणि प्रसार: दृकश्राव्य माध्यमातून प्रादेशिक भाषेचा प्रसार करणे, चित्रपट महोत्सव आयोजन, विविध ठिकाणी फिरते चित्रपट महोत्सव, छोट्या गटांमध्ये त्यांचे प्रदर्शन करणे, ‘ एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानाच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांचा प्रसार, यासाठी केंद्र विविध राज्यांच्या सहकार्याने उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे,बहुभाषिकतेचे ज्ञान वाढवणे, त्याची वैशिष्ट्ये समजून घेणे
- भाषा शिकण्यासाठी विविध पद्धतींचा वापर: बोलणे, ऐकणे, लिहिणे,विविध अॅप्सच्या वापरातून याचा सराव (उदा. शिक्षण मंत्रालयाने विकसित केलेले भाषा संगम अॅप ) याविषयी जनजागर करणे, तंत्रज्ञान आणि भाषा यांतील आंतरसंबंध समजून घेणे, शिकण्याच्या आधुनिक माध्यमांचा वापर, प्रादेशिक वृत्तपत्रांच्या मदतीने भाषा शिकणे
- भूगोल आणि स्थानिक पर्यावरण: भौगोलिकदृष्ट्या भारत वैविध्यपूर्ण आहे. हवामान व पर्यावरणाची परिस्थिती भीन्न आहे. उत्तर भारतीय राज्यांना हिमाच्छादित पर्वतराजीचे संरक्षण आहे. एकीकडे हिमालय आहे तर दुसरीकडे थारसारखे विस्तीर्ण वाळवंट, उष्णकटिबंधातील जंगल, अतिवृष्टीने निर्मित वर्षावन, विस्तीर्ण समुद्र किनारे, बेट, समुद्र किनारे, पठार अशा वैविध्यपूर्ण हवामानांचा हा देश आहे.
read more