पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE)
संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद अर्थात UNFCCC COP26 मधे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट( LiFE) अभियानाची घोषणा केली. हवामान बदलांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे हे या अभियानाचे ध्येय आहे.
स्त्रोतांचा मर्यादीत व गरजेपुरताच वापर करण्याची मानसिकता विकसित करणे. पर्यावरण चक्राला बाधा होऊ नये अशाप्रकारे जीवनशैलीत बदल घडवून आणने. वापरा व फेकून द्या या प्रवृत्तीमुळे होणारी अतिरिक्त नासधूस थांबवण्यासाठी या उपक्रमात प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येकाने दैनंदिन सवयीत छोटे बदल केल्यास हवामान बदलांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणे शक्य आहे या विश्वासातून हे उपक्रम हाती घेतले आहेत.
सोशल नेटवर्कची पोहोच व क्षमतांचा वापर करून हा संदेश LiFE मिशन द्वारे दिला जात आहे. पर्यावरण पप्रेमी व त्यासंबंधी संवेदनशील व्यक्तींचा जागतिक लढा उभारण्याचाच हा सामुहिक प्रयत्न आहे. या पर्यावरण संरक्षक सैन्याला ‘Pro-Planet People’ (पृथ्वी संरक्षक लोक) अशी संज्ञा दिली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली साठी हे सदस्य वचनबद्ध राहून काम करतील. पर्यावरण अनुकूल सवयींचा प्रचार करतील.
LiFE मिशनमध्ये प्रामुख्याने ३ स्तरांवर काम होणे अपेक्षित आहे:
व्यक्तिगत सवयींमध्ये बदल घडवणे
प्लास्टिक वस्तू वा पिशव्यांचा एकदाच वापर करून त्या फेकून देणे अर्थात सिंगल यूज प्लास्टिकचे दुष्परिणाम भयावह असल्याची जाणीव जागृती करणे. सायकल, ई-बाईक्स, ई-कार या वाहतूकीच्या साधनांना प्रोत्साहन देणे. त्याच्या वापरासाठी लोकांना प्रेरीत करणे. पाण्याचा अपव्यय टाळणे. पर्यावरणास अनुकूल उत्पादनाला चालना (सेंद्रिय,प्लास्टिक मुक्त, सौम्य , एनर्जी स्टार मानांकन असलेली उत्पादने) , पेहरावामध्ये पर्यावरणास अनुकूल वस्तूंचा वापर ( लेदर, फर, प्राण्यांवर प्रयोग करून निर्मित उत्पादने टाळणे)
सामूहिक भागीदारीतून निर्मिती प्रक्रियेचा प्रचार
विविध समुहांचा हातभार लागला तर काही संकल्पना जगभरात कृतीत उतरवता येतील. कार्बन उत्सर्जित करणाऱ्या उद्योगांमुळे होणारी हानी व त्याविषयी माहिती प्रसारीत करणे. पर्यावरण जोपासण्यास पूरक गुंतवणूक, ऊर्जा स्त्रोतांची निर्मिती व उपभोगात अपारंपारिक स्त्रोतांना प्राधान्य.
स्थानिक संस्कृती, सवयी, उत्पादनांना प्राधान्य
सामुहिक स्तरावर बागेचा विकास, टाकाऊ वस्तूंमधून पुनर्निर्मिती, कपड्यांचा पुनर्वापर व त्यासंबंधी जागरूकता, शहरी शेती (हायड्रोपोनिक्स शेती), अन्नाची नासाडी रोखणे, सामूहिक प्रयत्नांना बळकटी देणे, पर्यावरणाविषयी अभ्यासक्रमातून मानसिकता घडवणे, युवाशक्तीची भागीदारी वाढवणे.
read more