आदिवासी कल्याण
देशभरात आपला समृद्ध वारसा आणि संस्कृती जतनाच्या कामात आदिवासी समुदायांचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्य चळवळीत या समुदायांचे योगदान काय होते, या संबंधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानात अनेक उपक्रमांतर्गत माहिती प्रसारीत केली जात आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहचवली जात आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची संख्या १० कोटी ४ लाख आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ८.६ % लोक आदिवासी आहेत. भारताच्या विकास प्रक्रियेत यांचे योगदान लक्षणीय आहे. स्वातंत्र्य चळवळीत, क्रिडा क्षेत्रात आणि व्यवसाय-व्यापारातही या समुदायाने ठसा उमटवला आहे.