एकात्मता
सांस्कृतिक वैविध्याने नटलेला देश ही भारताची ओळख आहे. उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत आणि पूर्व ते पश्चिम या भूमिवर शेकडो संस्कृती वसतात. विविध परंपरा, भाषा, खानपान, पेहराव, उत्सव आणि अनेक प्रकारचे वैविध्य इथे आहे.विविधतेत एकता निर्माण करून विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणे ही आत्मनिर्भर भारत या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीकोनाची मूल भावना आहे. त्यामुळे पंच प्रण या ध्येयधोरणा अंतर्गत ‘एकात्मता’ तत्वाचा समावेश केला आहे. ७६ व्या स्वातंत्र्य दिनी भूमिका मांडताना पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला होता. समान उद्देश घेऊन आपण एकत्रित मार्गक्रमण करावे आणि स्वातंत्र्याची शंभरी एकात्मतेतून उज्ज्वल होईल याबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला होता.
इतिहास आणि संस्कृती
सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश, इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची माहिती, महत्त्वाचे शोध, प्रयोग याची माहिती, तंत्रज्ञानातील वेगाने होणाऱ्या बदलांची माहिती, सामाजिक अभिसरण-समरसता प्रक्रिया, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र याचे प्राचीन काळात असलेले ज्ञान व त्याची पद्धती इत्यादीची माहिती.
- सीमेवरील गाव, वस्ती आणि देशातील दुर्गम भाग: देशाच्या सीमेवर असलेल्या गावांचा विकास, स्थानिक कलाकारांना, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन, प्रादेशिक खानपानाचा प्रसार, प्रादेशिक-स्थानिक भाषांना मुख्य प्रवाहात जोडणे, पर्यटनातून रोजगार व संधी निर्माण करणे व सीमेवरच्या गावांना यातून जोडणे.
- एक भारत श्रेष्ठ भारत: भाषिक ज्ञानाचे आदान प्रदान, खानपान, पेहराव, उत्सव, लोककला, क्रीडा प्रकार, नाटक, चित्रपट यांचे पर्यटन व इतर उपक्रमातून आदान प्रदान, सांस्कृतिक संपर्क मजबूत करण्यास प्रोत्साहन, समृद्ध सांस्कृतिक ठेवा प्रदर्शित करणे, बंधूभाव व एकात्मतेला या माध्यमातून चालना देणे.
- स्वातंत्र्य सेनानी आणि दखल न घेतल्या गेलेल्या कर्तृत्ववान व्यक्ती: इतिहासात नोंद न झालेल्या आणि तुलनेने कमी माहिती असलेल्या स्वातंत्र्य सेनानींची ओळख व माहिती देणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सन्मानित करणे, याद्वारे नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणे, आदिवासी चळवळी व नेत्यांविषयी माहिती, त्यांची मूल्ये स्मृती रूपाने जतन करणे
- आदिवासी समुदाया: आदिवासी कलांना प्रोत्साहन, चित्रकला, वस्त्र, मृदकला, सेंद्रीय आणि नैसर्गिक आदिवासी अन्न उत्पादन, आदिवासींच्या अर्थकारणाची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांना जोडणे, आदिवासी समुदायांची सामाजिक,सांस्कृतिक वीण समजून घेणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, पारंपारिक कलांना नव्या कौशल्यांची जोड देणे.
- ग्रामीण कारागीर: स्थानिक कलांना जोपासणे व त्यांना प्रदर्शित करणे, कारागीरांना प्रोत्साहन देणे, या कलाप्रकारांचा प्रसार करण्यासाठी त्याचे अभ्यासक्रम आखणे, लुप्त होत चाललेल्या कलाप्रकारांना प्रयत्नपूर्वक चालना देणे
- क्रीडा: स्थानिक आणि प्रादेशिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी जागरूकता, लिंग समतेला क्रीडा क्षेत्रात बळकटी देणे, निष्णात सदस्यांना संधी देणे, कबड्डी सारख्या जुन्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे.
- चित्रपट आणि संगीत: प्रादेशिक भाषांमधील संगीत प्रकारांचा प्रचार-प्रसार, प्रादेशिक भाषांची लोकप्रियता कायम राखण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक कलाकारांना संधी देणे, नाटकांना -रंगकर्मला प्रोत्साहन
- युवा आणि राष्ट्र उभारणी: युवांच्या अभिव्यक्तीला मंच देणे, राष्ट्राप्रती त्यांच्या कर्तव्याविषयी जागरूकता निर्माण करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जागरूकता, स्वयंसेवेचे महत्त्व सांगणे, युवा केंद्रीत विषय( शाश्वत विकास, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य, पाणी व्यवस्थापन.) जनजागर, देशभक्तीच्या भावनेला प्रज्वलित ठेवणे, सांस्कृतिक वारशाबद्दल संवेदनशिलता, करिअर सल्ला, उद्यमशिलता विकास, स्टार्टअप्स अनुकूल वातावरण, पर्यावरण संवर्धन, डिजिटल साक्षरता, अर्थ साक्षरता
- प्रत्येक घरापर्यंत पोहोच निर्माण करणे, दैनंदीन वेळापत्रकात समावेश करणे: उदा. चाय पे चर्चा
- ७६ व्या स्वातंत्र्य दिनी , १५ ऑगस्ट २०२२ रोजी माननीय पंतप्रधानांनी ‘पंच प्रण’ या संकल्पनेची हाक दिली होती. त्याचा तपशिल:
- विकसित भारताचे ध्येय: दृढ संकल्पाने आणि मोठे उद्दीष्ट्य समोर ठेवत मार्गक्रमण- सर्वार्थाने विकसित भारताच्या दिशेने प्रयत्न, यात कोणतीही तडजोड असता कामा नये.
- वसाहतवादी मानसिकता झटकून टाकणे, त्याग करणे: वसाहतवादी मानसिकतेचा लवलेशही आपल्या मनात, वागणुकीत असू नये. दडपशाहीचे लोढणे झुगारून, त्याचे कोणतेही दडपण मनावर न ठेवता मार्गक्रमण. बौद्धीक, मानसिक कोणतीही गुलामगिरी असता कामा नये.
- मूळ संस्कृतीबद्दल सार्थ अभिमान: आपल्या वारशाचा, परंपरांचा अभिमान बाळगुन वाटचाल करणे. या वारशानेच भारताला सुवर्ण युग दिले होते याचे भान असले पाहिजे. याच वारशाला पुढे नेत आपण एक विकसित राष्ट्र निर्माण करू शकतो याबद्दल आत्मविश्वास असला पाहिजे.
- एकात्मता: विकसित भारताच्या प्रयत्नांमध्ये एकात्मता अनिवार्य आहे.
- कर्तव्य भावना जागरूक असणे: राष्ट्र उभारणीत प्रत्येकाला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव असणे, देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलणे, त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
- विविध क्षेत्रातून प्रयत्न: संवाद आणि एकात्मता वाढवण्यासाठी विविध कल्पना मांडणे व अंमलात आणणे. खुल्या मनाने त्यास प्रोत्साहन देणे.
read more