आरोग्य आणि निरामयता | थीम 2.0 | आजादी का अमृत महोत्सव, भारत सरकार।

आरोग्य आणि निरामयता

Health and Wellness

आरोग्य आणि निरामयता

आरोग्याच्या क्षेत्रात रुग्णालय, वैद्यकीय साहित्य-उपकरणे, क्लिनिकल चाचण्या,आऊटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य वीमा यांचा समावेश होतो.  प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धती हे दोन घटक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

भारताच्या संदर्भात विचार केल्यास आयुर्वेद, योग, निसर्गोपचार याचे पारंपारिक ज्ञान आपल्या जीवनशैलीचा भाग राहिले आहे. पूर्वीपासून याचा वापर होत आहे. युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांचे भारतातील आरोग्य यंत्रणेत अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. दैनंदिन जीवनातही याच्याशी संबंधित सवयी आहेत.

आरोग्य सेवांची व्याप्ती

  • आयुष: भारतातील पारंपारिक औषधींचा प्रसार व प्रचार करणे. भारतीय ज्ञान प्रणालीत याचे स्थान महत्त्वपूर्ण सिद्ध झाले आहे. आयुष क्षेत्राची व्याप्ती आता विस्तारली आहे. भावी काळात यात आणखी भर पडेल. 
  • निरामय व सुदृढ शरीरासाठी योग: अनेक शतकांपासून योग विद्या व त्यातून मिळणाऱ्या सर्वंकष निरामयतेने जगाचे लक्ष वेधले आहे. वर्तमानात शारीरिक हालचालीचे प्रमाण कमी होत आहे. जीवनशैलीमुळे शरीराची हालचाल कमी होत आहे. प्रत्येकाच्या जीवनात योग विद्येला स्थान मिळवून देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
  • उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद: आयुर्वेदाची महत्त्वाची भूमिका आणि कार्याचे महत्त्व प्रसारीत करणे, पंचमहाभूत (अर्थात निसर्गातील घटक व मानवी शरीरातील आंतरबंध) याविषयी जागरूकता पसरवणे. 
  • मानसिक आरोग्य आणि तणावाचे व्यवस्थापन: सार्वजनिक क्षेत्रांत अभियान, कॉर्पोरेट उपक्रम, औषधोपचार, योग सत्रांचे आयोजन, परीक्षांच्या काळातील ताण निर्मूलनासाठी उपक्रम, कामाचे तास अमर्याद व वेळापत्रक विहिन असणाऱ्या (पोलिस, आरोग्य .)  क्षेत्रातील व्यक्तींसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्यासंबंधी  समुदेशन करणे.
  • सुदृढ भारताच्या दिशेने: लक्ष्यगट निश्चित करून विविध उपक्रमांचे आयोजन- महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, शहरी नोकरदार वर्ग
  • गर्भवती माता व बाल आरोग्य: विशेष आरोग्य शिबिरे, चर्चासत्रांचे आयोजन करणे. याद्वारे आरोग्याच्या देखभालीसाठी अभिनव व नव्या पद्धतींचा प्रचार करणे.
  • पोषणाहार आणि शिक्षण: मध्यान्ह भोजनाच्या उपक्रमासह त्याचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न. रोग प्रतिबंधात्मक उपाय, पोषण वाटिका, स्मार्ट ट्रॅकर्स  . प्रयोग
  • आरोग्य आणि स्वच्छता : आरोग्य सेवांचा विस्तार, वैयक्तीक आरोग्यासंबंधी जनजागर, प्राथमिक उपचारांची माहिती देणे, मासिक पाळीदरम्यानची काळजी, गर्भधारणे दरम्यान आरोग्याची काळजी, लसीकरण, निरामय आरोग्यासाठी जीवनशैलीतील सुधारणा संबंधी माहिती.
  • आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्स: आरोग्य क्षेत्राची कुमक वाढवण्यासाठी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे. परिणामकारक आरोग्य उपक्रमांसाठी त्यांच्याकडून काम करून घेणे. 
  • खेळाचे वेळापत्रक, क्रीडा: दररोज मैदानी खेळ व इतर खेळांचे वेळापत्रक निश्चित करण्यास प्रोत्साहन, शाळांतून व इतर संस्थात्मक उपक्रमातून त्याचा प्रसार. 
  • आरोग्य पर्यटन: आरोग्य पर्यटनास चालना देण्यासाठी परिषदांचे, चर्चासत्रांचे आयोजन करणे, आरोग्य पर्यटनाविषयी माहिती देणे, या क्षेत्रातील नवे प्रवाह, संधी, आव्हाने यांची जाणीव देणे, परवडण्याजोग्या आरोग्य सेवा व त्यातील भारताचे महत्त्व विशेष मोहिमांच्या माध्यमातून पोहचवणे, प्रसारीत करणे. 
  • बालकांतील स्थूलपणा: शहरी भागात विशेष मोहिम हाती घेऊन जंक फूड व त्याचे परिणाम याविषयी जनजागरण, मुलांच्या शरिराच्या वाढीसाठी योग्य आहार कोणता यासंबंधी जागरूकता पसरवणे. 
  • लसीकरण अभियान: व्यापक स्तरावर लसीकरण मोहिमेचे आयोजन- लसीकरण वेळेत व सर्वत्र उपलब्ध करवून देणे. कोविडच्या अनुभवातून मिळालेला धडा व विविध देशातील स्थिती याविषयी माहितीचे आदान प्रदान, लसीकरणाच्या आदर्श पद्धती विषयी अवगत करून देणे. 
  • नवा भारत – जागतिक स्तरावर फार्मसीचे केंद्र करण्यास प्रोत्साहन: जगातील औषध निर्मिती उद्योगात उत्पादनाच्या स्तरावर भारताचा क्रमांक तिसरा आहे. भारतीय औषध निर्माता कंपन्या त्यांच्या माफक दरांमुळे स्पर्धेत सरस ठरत आहेत. दर्जाच्या बाबतीत देखील या कंपन्या आघाडी घेताहेत.  जगात त्यांनी आपल्या उत्पादनांचा ठसा उमटवला आहे. जगातील एकूण लस निर्मितीपैकी ६० टक्के निर्मिती भारतात तर जेनेरिक औषधात २० टक्के वाटा भारतीय फार्मा कंपन्यांचा आहे. 
  • हेल्थ टेक आणि टेलिमेडिसिन क्षेत्राचा विकास व आधुनिकीकरण
read more

Top