पाणी | थीम 2.0 | आजादी का अमृत महोत्सव, भारत सरकार।

पाणी

Water

पाणी

पाणी म्हणजे जीवन. जीवनाची पूर्वअटच म्हणावे लागेल. पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता मर्यादीत आहे. पाणी वितरणात असमानता असल्याने अनेक लोक त्यामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या जीवनावर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. 

जलसंधारण आणि स्त्रोतांचे  पुनरूज्जीवन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार विविध अभिनव अभियान राबवत आहे. यात हर खेत पानी (प्रत्येक शेतात पाणी) , नदी उत्सव, अमृत सरोवर या अभियानांचा समावेश आहे. 

पाण्याचे विविध स्रोत आणि त्याविषयी जनजागरण

नदी

भारतातील नद्यांचा इतिहास आणि त्याच्या आजच्या स्थितीविषयी लोकशिक्षण करणे. भारतात नद्यांचे व्यापक जाळे होते व आहे.  

  • भारतातील नद्यांचा इतिहास: नदीचा उगम, आज सागरी व्यापारांच्या मार्गात या नदी प्रवाहांचे महत्त्व, नदी काठावर विकसित झालेली संस्कृती व त्यातील वैविध्य याविषयी माहिती प्रसारीत करणे.
  • नदीचे सांस्कृतिक महत्त्व: नदीच्या नावाने आयोजित उत्सव ( गंगा उत्सव, नदी उत्सव), नदीचे धार्मिक महत्त्व, नदी काठावर वसलेल्या लोकांमधील कला प्रकार, कारागिरांची कौशल्ये यासंबंधी माहिती देणे.
  • जल प्रदूषण: नदीकाठी जमा होणारा कचरा व त्याला नियंत्रणात आणण्याचे उपाय, औद्योगिक कचरा व त्याच्या दुष्परिणामांबद्दल जागर, जल प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, सक्षम सांडपाणी व्यवस्था, रक्षा समिती-नदी रक्षक अशा उपक्रमांची गरज, लोकसहभागातून जल स्त्रोतांचे पुनरूज्जीवन, पूर येण्याची कारणे, सांडपाणी पुनर्वापर पद्धती विषयी जल साक्षरता वाढवणे.
  • नद्यांच्या आसपासच्या वसाहती: नद्यांच्या आसपास वसलेल्या वसाहती विषयी ज्ञान, त्यांच्या उपजीविकेची साधने,नदीवर त्यांचे अवलंबित्व, या समुदायांच्या परंपरा, कला, येथिल वन्यजीव, वनस्पती तसेच जैववैविध्या विषयी लोकजागर.
  • आर्थिक स्त्रोत व व्यवहार: नदी पर्यटन, जल क्रीडा प्रकार (उदा. ह्रषीकेशमधे अनेक क्रीडा प्रकारांचा विकास) ,  व्यापाराच्या संधी, मासेमारी . , जलविद्युत क्षमता व निर्मिती, कृषीसंबंधी माहिती, उपलब्ध खनिजे व त्यांचे अर्थकारण. विषयी नदी साक्षरता वाढवणे.

भूजल

 स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियाना अंतर्गत अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार दरसाल भारतात ४००० अब्ज क्युबिक मिटर पाऊस पडतो. पावसाचे पाणी साठवण्याच्या बाबतीत जगातील देशांच्या तुलनेत भारताचा क्रमांक बराच खाली येतो. भारतात दरसाल केवळ ८ टक्के रेन वॉटर हार्वेस्टींग होते. भूजल पातळी वाढवण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

  • भूजल संवर्धनाच्या प्राचीन पद्धती: भूजल संवर्धनाच्या प्राचीन पद्धती व तंत्रांविषयी जनजागर सातत्याने गरजेचा आहे.कुंड, झालर, विहिरी, जोहाड या भारतात वापरण्यात येणाऱ््या प्राचीन पद्धती आहेत. प्राचीन सिंचन पद्धती देखील उपयुक्त आहेत.
  • भूजल संवर्धन: पाणी वाया घालवण्याचे प्रमाण अधिक असून त्यासाठी जलसाक्षरतेची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, भूजलाचे संवर्धन, सांडपाण्याचा पुनर्वापर, दुष्काळाच्या काळात पीक वाचवण्यासाठी तलावाच्या पाण्याचा वापर, पाणी पंचायत सारख्या अनौपचारीक उपक्रमांच्या वाढीची गरज, जलसाक्षरता वाढवण्यासाठी प्रयोगशिल प्रशिक्षण, तळ्यांचा विकास व संवर्धन, सार्वजनिक पाणवठ्यांसाठी पुढाकार, ग्रामीण पर्जन्य केंद्र, रेन वॉटर हार्वेस्टींगची यंत्रणा उभारणे, शेतकऱ््यांदरम्यान भूजलाच्या वाटपाचे नियोजन, शेतीसाठी उंच उतारांवर जल संधारण,पाणलोट व्यवस्थापन तंत्राचा विकास
  • आरोग्य आणि स्वच्छता: पिण्यायोग्य पाण्यासाठी स्वच्छतेची गरज, पाण्याद्वारे प्रसारीत होणाऱ््या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागर, पाण्याची शुद्धता व आरोग्य यातील आंतरसंबंधांविषयी लोकजागर, पाणी तुंबल्याने होणारे दुष्परिणाम याविषयी जागराची गरज.

Status and importance of traditional water conservation system in present scenario, Central Soil and Materials Research Station, New Delhi, National Mission for Clean Ganga (NMCG) (2019)

अमृत सरोवर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २४ एप्रिल २०२२ रोजी माननीय पंतप्रधानांनी मिशन अमृत सरोवरची सुरूवात केली. या अभियानाद्वारे जलसंवर्धना विषयी जनजागरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येत जिल्ह्यातील ७५ जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन करणे अपेक्षित आहे. 

  • अमृत सरोवरची उपयुक्तता: जिल्हास्तरावर लोकसहभागातून पाण्याचे संवर्धन करण्याचे प्रयोग, स्थानिक पातळीवर यासाठी समिती स्थापना, जल प्रवाहांचे नियमन, स्थानिक तलावांच्या अधिवासाबद्दल संवेदनशीलता , पाण्यातील जैववैविध्याबद्दल माहिती व त्याचे महत्त्व, पूर आणि दुष्काळाचे परिणाम, भूजल संवर्धनाच्या विविध पद्धतींविषयी साक्षरता वाढवणे.
  • अमृत सरोवर मिशनमधून काय साधायचे : जिल्हावार उपलब्ध पाणी स्त्रोतांना जीवंत व प्रवाही करणे, जल पर्यावरणाला संरक्षण देणे, त्यांचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन देणे, पाण्यावर निर्भर उपजीविकेच्या साधनांचा विकास, जल संवर्धन करणे व जल प्रदूषणावर नियंत्रण आणणे. पाण्याच्या स्त्रोतांना निर्मळ करणे.
read more

Water Events

05 Sep'23

Outreach program at Nagarjunasagar Dam u...

28 Aug'23

Outreach program at Umiam Dam under Azad...

24 Aug'23

Outreach program at Kalpong Dam under Az...

24 Aug'23

Outreach program at Bichom Dam, Kameng H...

Top