महिला आणि मुले | थीम 2.0 | आजादी का अमृत महोत्सव, भारत सरकार।

महिला आणि मुले

Women and Children

महिला आणि मुले

बालविकासात गुंतवणूक म्हणजे देशाच्या उज्वल भविष्यासाठीची ती मूलभूत निकड आहे. मूल्य, शिक्षण, बालकांचे आरोग्य हे कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासाचा पहिला निकष आहे. त्यावरून जगात देशाची प्रतिमा निश्चित होते. मुलांना नागरी, सामाजिक, मूल्य शिक्षणापर्यंत पोहोच मिळणे गरजेचे आहे. आरोग्य सुविधा,विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक क्षेज्ञातील विकासात बालकांचा समावेश अनिवार्य आहे. देशात बालसंगोपनात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. मात्र आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण या क्षेत्रांत ग्रामीण आणि दुर्गम भागात सुधारणांना भरपूर वाव आहे. 

मुलांप्रमाणेच महिलांचे सशक्तीकरण गरजेचे आहे. कुटुंबातील आणि एकल महिलांची स्थिती हा देशाच्या विकासाचा स्तर दर्शवणारा महत्त्वाचा मापदंड आहे. भारतात महिलांच्या चळवळींचा इतिहास दीर्घ राहिला आहे. शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत उल्लेखनिय यशही मिळाले आहे. महिला सबलीकरणासाठी विविध योजना, केंद्रीय -स्थानिक सरकारांचे प्रयत्न, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या सतत प्रयत्नांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. महिलांचा या उपक्रमांना प्रतिसाद आणि धैर्याने घेतलेला सहभाग यामुळे देशातील चित्र बदलत आहे. सर्व आघाड्यांवर यासाठी प्रयत्नातील सातत्य आहे. 

बाल विकास

बाल विकासाच्या बाबतीत खाली उल्लेखलेल्या मुद्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे:

पोषण, आरोग्य आणि स्वच्छता

  • बालकांचे कुपोषण व त्याबद्दलचे अज्ञान मोठी समस्या आहे. विशेषत: दुर्गम, अविकसित क्षेत्रांत यावर काम होणे गरजेचे आहे. शाळेत मध्यान्ह भोजन अनिवार्य आहे. 
  • मातांचे आरोग्य, गर्भधारणेनंतर घ्यावयाची काळजी, मातांना घरोघरी जाऊन समुपदेशन, मासिक पाळी दरम्यान आवश्यक साधनांपर्यंत पोहोच, ग्रामीण शाळांमध्ये आरोग्यासाठी अत्यावश्यक किट्सचे वितरण इत्यादी. 
  • क्षयरोग,मलेरिया,न्यूमोनिया, हिपॅटायटीस या आणि इतर संसर्गजन्य आजारांविषयी जनजागरण करणे. ग्रामीण भागांना संसर्गमुक्त, स्वच्छतेविषयी जागरूक करणे. 
  • पौगंडावस्थेतील मुलांना भावनिक समुपदेशन व बदलांविषयी सजग करणे.
  • मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. मानसोपचार,समुपदेशन विषयी गैरसमज दूर करणे.

शिक्षण

प्राथमिक शिक्षणाची पोहोच व्यापक करणे, दर्जेदार क्रमिक पुस्तके - शैक्षणिक साहित्याचा ग्रामीण शाळांत खात्रीशीर पुरवठा. ग्रामीण भागात मुलींवर घरगुती कामाचा बोजा न टाकण्याविषयी जागर, नेतृत्वगुण विकास, मुलांना शाळेत पाठवण्याविषयी जागर, व्यावसायिक शिक्षण,वाचन-मूलभूत अंकगणित कौशल्य विकास, रोजगाराभिमुख कौशल्य तसेच शाळांना संगणक, ई-बुक्स इत्यादींचा पुरवठा.

  • बालसंगोपन विकास: गर्भधारणेपासून ते २.५ वर्षे वयापर्यंत अनुक्रमे माता व बालकाच्या पोषण गरजांविषयी जनजागर. खेळातून शिक्षण देण्याच्या पद्धतींचा वापर करणे. परीक्षांची तयारी तसेच तणावविरहीत शिक्षणासाठी संवाद. मुलांचे शिक्षणेतर उपक्रम, संवादी आणि समग्र उपक्रमांच्या माध्यमातून बालकांचा विकास साधणे इत्यादी.
  • शाळांसाठी पायाभूत सुविधा: शाळांमध्ये डेस्क, शाळेत जाण्यासाठी वाहनांची सुविधा, ब्रॉडबँड कनेक्शन, मध्यान्ह भोजन, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगण यासोबतच शाळेची इमारत व रचना पर्यावरणपूरक असण्यावर विशेष भर.
  • ऑनलाइन कौशल्य: डिजिटल साक्षरता वाढवणे, विषय निवडीसाठी अनेक पर्याय देणे, दुरस्थ शिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास, वेळ व्यवस्थापनाचे तंत्र शिकण्यास प्रोत्साहन देणे. 
  •  शिक्षकांचे प्रशिक्षण: ग्रामीण भागात शिक्षकांच्या प्रशिक्षणाविषयी जागरूकता वाढवणे. निमशहरी, छोट्या शहरांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी चालना देणे, व्यवसायाभिमुखतेसंबंधी शिक्षित करणे.
  • क्रिडा: शारीरिक आणि मानसिक वाढ -विकास जागर, क्रिडा क्षेत्रात भवितव्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, क्रिडांगण व इतर सुविधांचा विकास, उद्योन्मुख क्रिडापटूंना प्रोत्साहन, शारीरिक शिक्षकांंचे प्रशिक्षण, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती.
  • अभ्यासेतर उपक्रम: क्रमिक पुस्तकांशिवाय इतर कौशल्यांचा विकास करणे. मुलांना वक्तृत्व, विचारांना चालना देणारे उपक्रम, सामाजिक, संवाद क्षमता विकास, सांघिक भावना, निकोप स्पर्धेसाठी प्रोत्साहीत करणे. 
  • आभासी जगाचा व्यवहार्य वापर: सोशल मीडियाचा अतिरेकी वापर व त्याचे दुष्परिणाम याची जाणीव करून देणे. अर्थात डिजिटल डिटॉक्स करणे. स्क्रिनवरच्या वेळेला मर्यादित ठेवणे, झोपेचे वेळापत्रक व पुरेशा झोपेचे महत्त्व समजावून देणे. 
  • हुल्लडबाजी, गुंडगिरीला लगाम: शालेय व महाविद्यालयीन काळ हा घडणीचा काळ असतो. या शैक्षणिक वातावरणाला रॅगिंग, इतर हुल्लडबाजी मुळे धक्का लागू नये यासाठी अशा वर्तनाविरुद्ध मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे. विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रवृत्ती निर्माण होणे किंवा त्याविषयी भय निर्माण न होण्यासाठी समुपदेशन समित्या शाळांमध्ये असाव्यात. शैक्षणिक आवारात निकोप वातावरणासाठी विद्यार्थ्यांचा मानसिक समस्यांकडे लक्ष पुरवणे.
  • करिअर समुपदेशन: विविध विद्याशाखांची माहिती, वाव असणारी कार्यक्षेत्रे, कौशल्याधारीत प्रशिक्षण, उद्योग अभिमुख शिक्षण, शिष्यवृत्तींची माहिती, परदेशी विद्यापीठांबद्दर जागर, करिअर निवडीचे तंत्र, व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
  • वक्तृत्व,संवाद कौशल्य आणि भाषा: प्रादेशिक भाषा शिकणे, संप्रेषण कौशल्य विकसित करणे, ऑटिझमचे निदान लवकरात लवकर होणे, शारिरीक व मानसिक वाढीतील समस्यांचे निदान, संभाषण कौशल्यातील अडचणींचे निदान व उपाय
  • विशेष मुलांसाठी: विशेष मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, दिव्यांगांसाठी सुविधा, ब्रेल लिपीतील पुस्तकांची उपलब्धता वाढ, स्वच्छतागृहांची रचना व शाळेत रॅम्पसारख्या पायाभूत सुविधा, या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित शिक्षक व कर्मचाऱ््यांची उपलब्धता.
  • शैक्षणिक अनुशेष:ग्रामीण व शहरी मुलांदरम्यान शैक्षणिक, पायाभूत सुविधा आणि सामाजिक दरी राहू नये यासाठी सुविधांची समान व न्याय्य उभारणी, उपलब्धता व अंमलबजावणी.
  • सुरक्षा आणि स्वसंरक्षण: स्वसंरक्षणाची मूलभूत कौशल्ये शिकवणे, छेडछाड व तत्सम घटनांबद्दल संवादातून समजावून सांगणे, सार्वजनिक वाहतूक व स्थळांना सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने योजना आखणे, त्यासंबंधी जागरूकता वाढविणे.
  • व्यसनाविषयी दक्षता: मुले मादक द्रव्यांकडे आकर्षित न होण्यासाठी दक्षता उपाययोजना, समवयस्कांचा दबाव, वाईट संगत . बद्दल दक्षता, वागणुकीतील विकृती, मानसिक तणावापासून सुटकेसाठी संवाद , अशा गर्तेत अडकल्यास कौटुंबिक व व्यक्तीगत समुपदेशन, दुष्परिणामांची जाणीव देणे.
  • बाल संरक्षण कायद्याबद्दल जनजागर: बाल न्याय अधिनियम ( अल्पवयीनाची काळजी आणि संरक्षण ) २०००, मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणहक्क कायदा २००९ , बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा कायदा 2016; बालविवाह प्रतिबंध कायदा (2006)
  • बाल मजूरी : बालहक्कांविषयी जागरूक करणे. बाल मजूरी प्रतिबंधक कायदा दुरूस्ती अधिनियम २०१६, बालकांचे शारीरिक आणि मानसिक शोषण, बाल तस्करी, कामाच्या ठिकाणी असणारी धोकादायक स्थिती
  • संस्कृती संवर्धन व जनजागरण: देश व जगाच्या समृद्ध संस्कृतीविषयी जागृती, आदीवासींचा वारसा, स्वातंत्र्यसेनानीं विषयी माहिती, सांस्कृतिक वैविध्याला प्रोत्साहन, स्थापत्य वारशांबद्दल, उत्सवांविषयी, भाषिक वैविध्य, या विविधतेतील ऐक्याचा प्रसार-प्रचार. 
  • संगीत: संगीताच्या समृद्ध वारशाविषयी जनजागर, आंतरसांस्कृतिक आदान-प्रदान, भाषिक वैविध्याचा स्वीकार करून परस्परांच्या भाषा समजून घेण्यासाठी प्रयत्न. 
  • उद्यमशीलता आणि नव संकल्पनांना प्रोत्साहन: स्टार्ट- अप्सना स्त्रोतांपर्यंत पोहोच देण्यासाठी प्रयत्न. कौशल्य विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पोहोच सुकर करणे.
  • राष्ट्र उभारणीत बालके-तरुणांचा सहभाग : v
  • भावी पिढीसाठी जिव्हाळ्याचे विषय: शाश्वत विकास, हवामान बदल, मानसिक आरोग्य, लिंग समानता, शाकाहार, राष्ट्र उभारणी, पाणी व्यवस्थापन, सर्वसमावेशी विकास, व्यसनाधीनतेच्या समस्या, तंत्रज्ञानातील बदलांविषयी जागरूकता. 

महिला सबलीकरण

महिलांच्या जीवनमानाचा विकास आणि त्यात चांगले बदल घडवून आणण्यासाठी निश्चित दिशादर्शन करणारे मुद्दे इथे मांडले आहेत:

  • मातांच्या आरोग्याची काळजी: गर्भधारणेदरम्यान योग्य आरोग्य सल्ला, गर्भधारणेनंतर मातेचे वजन योग्य असणे, गर्भपातामुळे असणारे धोके, गर्भधारणेपूर्वी व नंतर पोषक आहार, या काळात मादक द्रव्यापासून, व्यसनांपासून बचाव, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध
  • मासिक पाळीदरम्यान काळजी: मासिक पाळीदरम्यान स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य. यासाठी आवश्यक सॅनिटरी पॅड व इतर साहित्याची उपलब्धता ते वापरण्यासंबंधी महिलांमध्ये जागर. 
  • जन्मदर नियंत्रण आणि कुटुंब नियोजन: कुटुंब नियोजनाचे महत्त्व, नियोजन न करता होणारी गर्भधारणा, जन्मदर नियंत्रणासाठीच्या पद्धती, किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी जागृती निर्माण करणे.
  • बालसंगोपन: वयाच्या विविध टप्प्यांवर पोषणाच्या गरजांसंबंधी जागरूकता, ०-१, १-२, २-५, ५-१० वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण, दर्जेदार शिक्षण, अंगणवाडी, बालवाडी पर्यंत बालकांची पोहोच वाढवणे.
  • पोषण आहार, आरोग्य: पोषणातील उणीवांविषयी माहिती देणे, अशक्तपणा, प्रजनन क्षम वयातील आरोग्य समस्या, स्वत:ची व परिसराची स्वच्छता, मानसिक आणि भावनिक आरोग्याबद्दल जाणीव जागृती करणे. 
  • शिक्षण: वयाच्या ६-१४ वर्षे वयापर्यंत अनिवार्य व मोफत शिक्षण मिळणे हा कायद्याने प्रत्येकाचा अधिकार आहे, यासंबंधी सरकारी मदत, योजना, शिष्यवृत्ती, मुलींच्या शिक्षणासंबंधी विशेष जनजागर
  • करीअर घडवण्याच्या दिशेने: करीअरच्या विविध दिशासंबंधी मार्गदर्शन करणे, विविध क्षेत्रातील अर्थार्जनाच्या संधी, व्यावसायिक प्रशिक्षणांची माहिती, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, कामकरी महिलांना विशेष प्रोत्साहन व आधार. 
  • लिंग विषमता: स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह प्रतिबंध, शिक्षणाच्या समान संधी, कामाच्या ठिकाणी समान संधी, महिलांना विविध क्षेत्रात करिअरसाठी मार्गदर्शनाची उपलब्धता  या लिंगभेद केंद्रीत समस्यांवर काम करणे.
  • स्वसंरक्षण, सुरक्षा: आत्मरक्षणासाठी मूलभूत कौशल्यांचा विकास, कौटुंबिक हिंसाचार विरुद्ध संरक्षण, सुरक्षेसंबंधी दक्षता, सार्वजनिक वाहतूक व स्थळांवर सुरक्षा उपाय, लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी कृतीशिलता वाढ.
  • महिलांमध्ये उद्यमशीलता विकास: स्वयंरोजगाराच्या संधींसाठी स्त्रोत उपलब्ध करून देणे, उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षण, वित्त पुरवठ्याचे पर्याय, विपणन तंत्रासाठी मदत, जनसंपर्क वाढवण्यासाठी मदत, महिला केंद्रीत क्षेत्र व उत्पादनांविषयी माहिती.
  • आर्थिक स्वावलंबन : आर्थिक साक्षरता ( बँकिंग प्रणालीचा वापर .) व्यावसायिक कौशल्य विकास, गुंतवणूकीच्या विविध पर्यायांविषयी माहिती , समान कामासाठी समान वेतनाचे महत्त्व सांगणे
  • महिला व मुलींच्या कायदेशीर हक्कांविषयी: शिक्षण घेण्याचा अधिकार (८६ वी घटना दुरूस्ती २००२ , मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण अधिकार २००९ अधिनियम , कामगार हक्क (फॅक्टरी अॅक्ट १९४८), मॅटरनल विशेषाधिकार व रजा अधिनियम १९६१, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५, हुंडाबळी, विवाहासाठी वयोमर्यादेसंबंधी कायदा, सरकारी योजनांविषयी माहिती , सुकन्या समृद्धी योजना २०१५, बेटी बचाओ-बेटी पढाओ २०१५, अंगणवाडी . कायदेशीर संरक्षण संसधानांविषयी माहिती.
  •  महिला कारागीर: महिला कारागिरांच्या (राष्ट्रीय, राज्य, केंद्रशासित प्रदेश, ग्रामीण, आदिवासी कारागीर ) कौशल्यांना चालना देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे स्थायी- अस्थायी प्रदर्शन व विक्रिचे आयोजन.
  • इतर क्षेत्रांचा वेध: महिलांशी संबंधीत संधी आणि विविध क्षेत्रातील त्यांना असणारा वाव यांचा शोध घेणे, त्या क्षेत्रांशी त्यांचा संपर्क वाढवणे. महिलांना मिळू शकरणाऱ््या संधीबद्दल माहिती देणे.
read more

Top